स्टिंग ऑपरेशनची सीडी बनावट – ‘आप’चा दावा

November 24, 2013 2:39 PMComments OffViews: 213

Image yogendra_yadaw_300x255.jpg24 नोव्हेंबर : आम आदमी पार्टीचे नेते आणि कार्यकर्त्यांचे स्टिंग ऑपरेशनची सीडी बनावट असल्याचा आरोप करून ते प्रसिद्ध करण्यात आलेली सीडी बनावट असल्याचा आरोप आज पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी केला. यासंबंधी पक्षातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी याविषयीची भूमिका स्पष्ट केली.

या फुटेजमध्ये बदल करण्यात आले आहेत, अनेक महत्त्वाचे संदर्भ गाळण्यात आले आहेत असं यादव यांनी यावेळी सांगितलं. हे फुटेज एकूण 14 तासांचं आहे. निवडणूक आयोगाकडून आम आदमी पार्टीला हे फुटेज मिळालं. ते संपूर्णपणे तपासल्यानंतर मीडिया सरकार या वेबसाईटचा खोटारडेपणा उघड झाल्याची टीका यादव यांनी केली.

 मिडीया सरकार या वेबसाईटने आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचे स्टींग ऑपरेशन करुन उमेदवार आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचे सांगितले. आम आदमीने मिडीया सरकारकडे स्टींग ऑपरेशनचे रॉ फुटेज मागितले होते. मात्र मिडीया सरकारने यास नकार दिला होता. अखेरीस आपने निवडणूक आयोगाकडून मिडीया सरकारने दिलेले रॉ फुटेज घेतले आहे.

 १४ तासांचे फुटेज पाहिल्यास स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकलेल्या सर्व नेते निर्दोष असल्याचे सांगत आपने उमेदवारांची पाठराखण केली आहे.

Comments are closed

close