कोल्हापुरातल्या शो रुमचं बांधकाम कोसळून 14 मजूर जखमी

February 11, 2009 11:24 AM0 commentsViews: 6

11 फेब्रुवारी कोल्हापूरकोल्हापुरातल्या शिरोली एमआयडीसीमधल्या एका बांधकामाचं स्लॅब अचानक कोसळलं. या स्लॅबच्या ढिगा-याखाली 14 मजूर अडकले. पण ही घटना घडल्यानंतर मदतकार्य लवकर पोहचल्यामुळे पुढील अनर्थ टळला.जखमी झालेल्या आठ मजुरांना उपचारासाठी डॉ.डी पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर बाकीच्या चार कामगारांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साई सर्व्हिसेसच्या शो रुमचं बांधकाम चालू असताना हा स्लॅब कोसळला. ही कंपनी सुरेश कलमाडी यांच्या मालकीची आहे.

close