अणूकार्यक्रमाबद्दल एक ऐतिहासिक करार

November 24, 2013 2:17 PM0 commentsViews: 272

iran24 नोव्हेंबर : इराण आणि जगातल्या सहा मोठ्या देशांमध्ये अणूकार्यक्रमाबद्दल एक ऐतिहासिक करार मंजूर झाला आहे. जिनिव्हामध्ये झालेल्या चार दिवसांच्या वाटाघाटीं नंतर हा करार करण्यात आला. याचर्चेत अणु प्रकल्पावरुन सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्यात या सहाही देशांना यश आले आहे.

 

या करारात, इराण आपल्या अणू विकास कार्यक्रमाची गती कमी करणा असून या बदल्यात इराणवरचे निर्बंध काही प्रमाणात कमी करण्यात येणार असून  हा करार फक्त 6 महिन्यांसाठी करण्यात आला आहे.

 

एकीकडे इराणकडून हे अणुप्रकल्प वीज निर्मितीसाठी असल्याचा दावा केला जात तर दुसरीकडे  पश्चिमेतील शक्तिशाली देशांना इराण अणुप्रकल्पातून अण्वस्त्रांची निर्मिती करत असल्याचा संशय होता. गेल्या दहा वर्षांपासून इराणवर अणु प्रकल्प बंद करण्यासाठी युरोपीयन देश दबाव टाकला जात होता.

 

भारत दर वर्षी 10 अब्ज डॉलरपेक्षाही जास्तच तेल आपण इराण कडून विकत घेतो त्यामुळे या करारा नंतर त्यात थोडी सुट मिळण्याची शक्यता आहे. त्या शिवाय या करारामुळे अंतराष्ट्रीय तेलाचेही भाव कमी होण्यास मदत होईल.

 

close