‘ऍडॉप्थॉन’ 2013

November 24, 2013 8:01 PM0 commentsViews: 170

24 नोव्हेंबर : रस्त्याच्या कडेला एकटे बसलेले किंवा जखमी अवस्थेत असणारे कुत्र्याची किंवा मांजरीची पिल्ले आपण नेहमीच बघतो.मात्र त्यांना घरी नेऊन, त्यांच्यावर उपचार करून नंतर त्या पिल्लांसाठी कोणीतरी योग्य पालक शोधणारी एक संस्था गेली 3 वर्ष मुंबईत काम करतेय.

‘पेट्स फॉर ऑल’ या संस्थेतर्फे ऍडोप्शन 2013 हा प्रोग्राम सध्या वांद्रे पश्चिमच्या हिंदू असोसिएशन मध्ये सुरू आहे. प्राणिप्रेमिंना त्यांना हवं असणारं कुत्र्याचं किंवा मांजरीच पिल्लू या ठिकाणी विनामुल्य दत्तक घेता येणार आहे.

close