कसाबवर गुन्हा दाखल करू – पाक

February 12, 2009 6:27 AM0 commentsViews: 1

12 फेब्रुवारी मुंबई हल्ल्यातला एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाबवर लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल, असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितलं. कसाबसह 13 जणांवर पाकिस्ताननं गुन्हा दाखल केल्याची बातमी प्रसारित झाली होती. पण पाकिस्तानच्या माहिती मंत्री शेरी रहमान यांनी या बातमीचा इन्कार केला. कसाबवर पाकिस्तानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या बातमीनंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी हा खुलासा केला आहे. तसंच मुंबई हल्ल्याप्रकरणी पाकिस्तान लवकरच भारताशी चर्चा सुरू करेल, असंही त्यांनी सांगितलं. पण कसाबसह इतर 13 जणांवर पाकिस्तानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिओ टीव्हीनं दिली होती. कराचीतल्या डॉकयार्ड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं जिओ टीव्हीनं म्हटलं आहे.

close