चौकशीसंदर्भात तेजपाल हायकोर्टात जाण्याची शक्यता ?

November 24, 2013 8:38 PM0 commentsViews: 124

tarun tejpal_tahalka24 नोव्हेंबर : आज गोवा पोलीस तरुण तेजपालची चौकशी करणार्‍याची शक्याता वर्तवली जात असताना, सूत्रांन कधून मिळालेल्या माहिती नूसार लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी गोवा पोलिसांकडून काढून घेण्याच्या मागणीसाठी तरुण तेजपाल हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे.

तहलका साप्ताहिकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्यावर एका महिला पत्रकाराने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. एका कार्यक्रमासाठी गोवा येथे गेले असता हॉटेलच्या लिफ्टमध्ये तेजपाल यांनी हे कृत्य केल्याची तक्रार महिला पत्रकाराने तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोभा चौधरी यांना ईमेलव्दारे केली होती. हा प्रकार उघड झाल्यावर गोवा पोलिसांनी स्वेच्छा दखल घेतल तेजपाल विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. रविवारी गोवा पोलिसांचे पथक दिल्लीत दाखल झाले.

त्यांनी शोभा चौधरी यांची नऊ तास कसून चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेतील तिघा साक्षीदारांचे जबाबही नोंदवून घेतले. आता गोवा पोलिसांचे पथक पुन्हा माघारी परतले असून लवकरच ते मुंबईत पिडीत तरुणीचा जबाब घेण्यासाठी येतील अशी चिन्हे आहेत.

दरम्यान, तेजपाल यांनी या प्रकरणाची चौकशी गोवा पोलिसांऐवजी स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत व्हायला हवी अशी मागणी केल्याचे समजते. या प्रकऱणात तेजपाल गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप पिडीत तरुणीने केल्यावर राष्ट्रीय महिला आयोगाने मुंबई पोलिसांनी पिडीत तरुणीला सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली आहे. तर चौकशीत आणखी काही माहिती उघड झाल्यास तेजपालवर आणखी काही कलम लावले जातील असे गोवा पोलिसांनी सांगितले.

close