मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये मतदानाला सुरुवात

November 25, 2013 9:39 AM0 commentsViews: 364

25 नोव्हेंबर : मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये मतदानाला सुरुवात झाली असून, मध्यप्रदेशमध्ये शिवराज विजयाची हॅट्ट्रीक साजरी करतील की काँग्रेस १० वर्षानंतर पुन्हा सत्ता स्थापन मिळवण्यात यशस्वी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले आहेत. राज्याच्या सर्व 230 जागांसाठी ही लढाई असणार आहे. मध्य प्रदेशच्या 51 जिल्ह्यांमधल्या सुमारे 54 हजार मतदान केंद्रात मतदान होणार असून एकूण 2 हजार 583 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. बुधनी आणि विदिशा या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आपले स्थान राखतात की काँग्रेसचे नेते सत्ता खेचून घेतात हे बघायचे आहे.

तर दुसरीकडे मिझोरममध्ये आज 6.9 लाख मतदार 142 उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहेत. सत्ताधारी काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रंट आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्यात ही लढाई असेल. रस्ते, दळणवळण, विकास हे या निवडणुकीतले मुख्य मुद्दे आहेत. मिझोरममध्ये पहिल्यांदाच वोटर व्हेरिफाईड प्रिंटर ऑडिट ट्रेल सिस्टीम वापरण्यात येणार आहे. यात आपले मत नीट नोंदवले गेले की नाही हे मतदाराला समजू शकते.

close