निराधार चिमुरड्यांना मिळाला आधार!

November 25, 2013 9:15 AM0 commentsViews: 253

Impact25 नोव्हेंबर : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गोरवाडी येथील आदिवासी मुले पोरकी झाल्याचे वृत्त आयबीएन लोकमतने प्रसारित केले होते. या वृत्ताची दखल घेत पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील फाळके एफ. एम. सी. जी या खासगी कंपनीने जितेंद्र, सागर ,अनंता या तीन मुलांना दत्तक घेतले आहे. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण आणि नोकरी देण्याचे आश्वासन फाळके कंपनीचे सीएमडी रवी फाळके यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना दिले आहे.

तर मानसिक आधारासाठी कंपनीचे वेगवेगळ्या ब्रॅचमधील मॅॅनेजर प्रत्येक महिन्यात त्यांची भेट घेतील त्यांच्याशी हितगुज करतील. दिशा केंद्राचे अशोक जंगले आणि मुलांना कंपनीच्या हेड आँफीसला बोलावून 15,000 रुपयांचा चेक दिला. तर कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनीही या मुलांना 6000 रुपये रोख रक्कम दिली आहे.

तर पेण आदिवासी प्रकल्पअधिकारी टी.एस. भोसले यांनी तीनही मुलांना एकाच आश्रम शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याच सांगितले आहे. शिवाय मुलांच्या आत्याला विशेष बाब म्हणून 50,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. तर रवी फाळके यांनी आयबीएन लोकमतने दाखविलेल्या वृत्तामुळे मदत करण्याची संधी मिळाल्याच सांगितल.

close