आंध्र विभाजनाच्या मुद्यावर राष्ट्रवादी मवाळ

November 25, 2013 7:10 PM0 commentsViews: 468

Image sharad_pawar_on_fixing456346_300x255.jpg25 नोव्हेंबर : नऊ वर्षांपूर्वी तेलंगणाला पाठिंबा देणार्‍या राष्ट्रवादीने आता आंध्रच्या विभाजनाबाबत मवाळ भूमिका घेतलीय. आज सोमवारी वाय.एस.आर.काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली.

राज्य विधिमंडळाचं मत विचारात घेतल्याशिवाय आंध्रचं विभाजन करण्याचा निर्णय घेऊ नये या जगनमोहन रेड्डींच्या मताला पवारांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं नऊ वर्षांपूर्वी तेलंगणाला पाठिंबा दिला होता. जगनमोहन रेड्डी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली.

मात्र मातोश्रीसमोर तेलंगाना समर्थकांनी जगनमोहन रेड्डींच्या गाडीसमोर निदर्शन केली. त्यांना काळे झेंडे दाखवले, पाण्यानं भरलेले फुगे फेकले.

close