‘हेलेन’चा पिकांना फटका

November 25, 2013 8:22 PM0 commentsViews: 108

25 नोव्हेंबर : हेलेन चक्रीवादळामुळे राज्यातल्या काही पिकांना फटका बसला आहे. रात्री अचानक आलेल्या वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील कापूस,तूर,टोमॅटो आणि ज्वारीच्या पिकांना चांगलाच फटका बसलाय. तर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे नाशिकमधल्या द्राक्षबागा धोक्यात आल्यात. सध्या द्राक्षबागांसाठी संवेदनशील काळ असतो. काही बागा फुलावर आल्यात तर काही ठिकाणी द्राक्षमणी तयार होत आहेत. अशावेळी सोमवारपासून नाशिक आणि परिसरात ढगाळ वातावरणाचा फटका द्राक्षबागांना बसतोय.

close