26/11चा कट पाकिस्तानातच रचला – पाकची कबुली

February 12, 2009 8:38 AM0 commentsViews: 3

11 फेब्रुवारीमुंबई हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचला गेल्याचं पाकिस्ताननं कबूल केलं आहे. भारतानं दिलेले पुरावे पाकिस्तानला मान्य असल्याचंही पाकिस्ताननं सांगितलंय. पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री रेहमान मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन याचं स्पष्टीकरण दिलंय.तसंच दोषींवर पाकिस्तानमध्ये खटला दाखल करणार असंही मलिक यांनी म्हटलंय.पाकिस्तानने आता या कटासंबंधी इतर पुरावे आणि कसाबच्या डीएनए चाचणीचे रिपोर्ट मागितले आहेत. मुंबई हल्ल्यासंबंधी 8 जणांवर एफआयआर दाखल केलं आहे आणि 6 जणांना ताब्यात घेतलं आहे.यामध्ये मुंबई हल्ल्याचे मास्टर माईंड जरार शहा आणि लखवीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती रेहमान मलिक यांनी दिली.संबंधीतआरोपींवर पाकिस्तानमधील कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्यातआलं आहे. भारताने जे पुरावे दिले त्याच्या आधारावर आम्ही तपास केला. तसंच आरोपी जरी पाकिस्तानचे नागरिक असले तरी पाकिस्तानच्या कुठल्याही सरकारी संस्थेचा या हल्ल्यात हात नाही, अशी माहिती रेहमान यांनी दिली.पाकच्या या कबुलीवर प्रतिक्रिया देताना राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी हे मुंबई पोलिसांचं मोठं यशं असल्याचं म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी दिलेले पुरावे पाकिस्तानने मान्य केले त्यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांचं अभिनंदन केलं आहे.

close