‘गेट वेल सून’ @ 50

November 25, 2013 9:55 PM0 commentsViews: 520

25 नोव्हेंबर : व्यसनाधिनता आणि त्यामधुन सुटका याविषयावर भाष्य करणार्‍या ‘गेट वेल सून’ या नाटकाचे पन्नास प्रयोग रविवारी पूर्ण झाले.या निमित्ताने हे नाटक ज्या मुक्ती पत्रे या आनंद नाडकर्णी यांच्या पुस्तकावर आधारीत आहे. त्या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं. व्यसनाधीन माणसाच्या मनातील गुंतागुंत आणि व्यसन सोडण्यासाठी त्या माणसाने त्याच्या संयमाशी दिलेला लढा हे चित्र ‘गेट वेल सून’ हे नाटक फार सुरेख पद्धतीने मांडतं. हे नाटक प्रचारकी वाटत नाही तर एक नाटक बघण्याचा आनंद या प्रयोगातून प्रेक्षक म्हणून अनुभवता येतो. या पन्नासाव्या प्रयोगाच्या निमित्ताने नियोजित नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी,मानसोपचार तज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी उपस्थित होते.

close