बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिल राज्याच्या ताब्यात

November 25, 2013 9:36 PM0 commentsViews: 441

Image img_223902_indumill_240x180.jpg25 नोव्हेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतल्या इंदू मिलमधल्या स्मारकापुढचा एक मोठा अडथळा दूर झालाय. इंदू मिलच्या जमीन हस्तांतरणाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिलीय.

 

आता संसदेच्या येत्या हिवाळी अधिवाशनात हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. ही जमीन सध्या केंद्रीय वस्त्रोद्योग खात्याकडे आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला,तर केंद्र सरकार ही जमीन राज्य सरकारला हस्तांतरीत करेल.

 

मुंबईतील दादर भागात इंदू मिलच्या 12.5 एकर जागेवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक व्हावं या मागणीसाठी दलित संघटनांनी आंदोलनं केली होती. अखेरीस मागील वर्षी केंद्राने इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं स्मारक होईल यावर शिक्कामोर्तब केलं होतं. मात्र इंदू मिलची साडेबारा एकरची जागा वर्ष उलटून गेले तरी राज्य सरकारच्या ताब्यात देण्यात आली नव्हती.

 

अखेर वर्षभरानंतर केंद्राने स्मारकासाठी जमीन देण्यासाठी केंद्राने हिरवा कंदील दिलाय. तर दुसरीकडे दलित संघटनांनी पुन्हा एकदा स्मारकासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे दलित संघटना निर्णयाचं स्वागत करते की आंदोलन मागे घेत हे पाहण्याचं ठरेल.

close