मुंबईच्या सुरक्षेची दैना

November 26, 2013 9:51 AM0 commentsViews: 210

आशिष जाधव, मुंबई
26 नोव्हेंबर : 26/11 च्या हल्ल्यानंतर पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासह मुंबईत 5000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना होती. पण लालफितशाही आणि निविदा प्रकियेचा घोळात सगळं काही अडकल आहे. विशेष म्हणजे राम प्रधान समितीच्या शिफारीशींच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या समितीची एकही बैठक राज्य सरकारने घेतलीच नाही .

26/11 च्या हल्ल्यात मुंबई हादरली. मुंबई शहराची सुरक्षा तर ऐरणीवर आलीच पण यात मुंबई पोलिसांच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या. त्यामुळे राज्य सरकारला राम प्रधान समिती नेमून हल्ल्याची चौकशी करावी लागली. पण या समितीच्या शिफारसींची अमलबजावणीच झाली नाही त्यामुळे मुंबई आणि पोलीस दलाच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.

 सूूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
- शस्त्रं आणि साधनसामुग्रीसाठी 10 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. पण त्यातला केवळ 40 टक्के निधीच खर्च झाला. अजूनही 60 टक्के निधी निविदा प्रकियेत आणि लालफितीत अडकून पडलाय.
- 39 ठिकाणी हल्ला विरोधी पथके तैनात करण्यात आली, पण तिथे जवान काम करण्यास इच्छुक नाहीत.
- 30 अद्यायवत सागरी बोटीं ऐवजी केवळ 10 बोटी तैनात झाल्या.
- सागरी पोलिस चौक्या आवश्यक त्या प्रमाणात कार्यरत झालेल्या नाहीत.
- 54 बुलेटप्रुफ वाहनांऐवजी निम्यांहून कमी म्हणजे 25 वाहनांची खरेदी झाली.
- मुंबई मध्ये 5 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय अजूनही निविदा प्रकियेत अडकलाय.
- बुलेटप्रुफ जॅकेट्स आणि बॉम्बरोधक गणवेशाची पूर्तता किती झालीय, याचं समाधानकारक उत्तर सरकारकडे नाही
- पण 1 हजार 500 कमांडोजचा समावेश असलेल्या क्विक रिस्पॉन्स टीम्स मात्र तैनात झाल्या आहेत.
- तसेच एनसजीच्या धर्तीवर फोर्स वन कमांडो पथकाची स्थापना सुध्दा सरकारने केलीय. त्याचेच गोडवे गाण्यात सरकार सध्या गर्क आहे.

इतकंच नाही तर 26/11 च्या हल्ल्यानंतर स्थापन झालेली समिती आणि राज्य सुरक्षा मंडळाची बैठक घ्यायलाही सरकारला वेळ मिळाला नाही, असा आरोप विरोधक करत आहेत.

26/11 च्या हल्ल्याच्या जखमा मुंबईकरांसह भारतीयांच्या मनावर खोलवर उमटला आहे. त्या जर मिटवायच्या असतील तर सरकारला अधिक सजगतेने मुंबईच्या सुरक्षिततेसाठी सज्ज व्हावं लागेल हेच खरं!

शिफारसींचं झालं काय ?
- शस्त्रं आणि साधनसामग्रीसाठी 10 हजार कोटींची तरतूद पण त्यापैकी 40 टक्केच निधी खर्च
- 60 टक्के निधी निविदा प्रकियेत आणि लालफितीत अडकून
- 39 ठिकाणी हल्लाविरोधी पथकंतैनात पण जवानांची काम करण्याची तयारी नाही
- 30 अद्ययावत सागरी बोटींऐवजी 10 बोटी तैनात
- सागरी पोलीस चौक्या आवश्यक प्रमाणात कार्यरत नाहीत
- 54 बुलेटप्रुफ वाहनांऐवजी 25 वाहनांची खरेदी
- मुंबईमध्ये 5 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय अजूनही निविदा प्रकियेत
- बुलेटप्रुफ जॅकेट्स आणि बॉम्बरोधक गणवेशांची पूर्तता नाही
- 1 हजार 500 कमांडोजच्या क्विक रिस्पॉन्स टीम्स तैनात
- एनसजीच्या धर्तीवर फोर्स वन कमांडो पथकाची स्थापना

close