मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, 3 जणांना अटक

November 26, 2013 11:30 AM0 commentsViews: 1864

Image img_235722_junnarrapecase3244_240x180.jpg26 नोव्हेंबर : महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना अद्यापही महिला असुरक्षित आहेत. मुंबईत  सोमवारी रात्री बोरीवलीतील एका मैदानाजवळ अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली.

सोमवारी रात्री बोरीवलीच्या एमएचबी कॉलनीच्या परिसरात 17 वर्षाच्या मुलीवर 4 जणांनी बलात्कार केला. एमएचबी कॉलनीतून जात असताना या मुलीच अपहरण करुन तिला एका टेम्पोमध्ये टाकून तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.

पीडित मुलीवर सध्या जेजे हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी सुरू आहेत. सोनू कांबळे,जयप्रकाश पाल,अस्लम खान या 20 ते 25 वर्ष वयोगटातल्या तिघा आरोपींना एमएचबी पोलिसांनी अटक केले असून 1जण आजूनही फरार असल्याचे वृत्त आहे.

close