शहिदांना श्रद्धांजली

November 26, 2013 12:57 PM0 commentsViews: 355

26 नोव्हेंबर :  मुंबईवरच्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज 5 वर्षे पूर्ण होत आहेत. हा दहशतवादी हल्ला परतवून लावताना शहीद झालेल्या वीरांना आज मुंबईतल्या शहीद स्मारकावर आदरांजली वाहण्यात आली.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासोबतच शहिदांच्या कुटुंबियांनीही इथे शहिदांना मानवंदना वाहिली. त्यांच्यासोबतच इस्त्रायल, सौदी अरेबिया आणि अमेरिकेच्या भारतातल्या राजदूतांनीही या शहिदांच्या सोबतच हल्ल्यात बळी पडलेल्या परदेशी नागरिकांनाही आदरांजली वाहिली.

close