तेजपालच्या अटकपूर्व जामीनअर्जावर उद्या हायकोर्टात सुनावणी

November 26, 2013 1:34 PM0 commentsViews: 101

BL21_TEJPAL_1660183f26 नोव्हेंबर : तरुण तेजपालच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता उद्या दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. तहलकामधले राजीनामासत्र अजूनही सुरुच आहे. आज तहलकामधल्या सीनिअर एडिटर राणा अयुब यांनीही राजीनामा दिला आहे.

तरुण तेजपाल यांनी केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निषेध करत अयुब यांनी राजीनामा दिला आहे. तहलकामध्ये काम करणं यापुढे आपल्या तत्त्वात बसत नसल्याचे सांगत त्यांनी राजीनामा दिला आहे. हे प्रकरण पुढे आल्यानंतर तहलकामधला हा पाचवा राजीनामा आहे.
दरम्यान, गोवा पोलिसांच पथक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. तेजपालवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केलेल्या महिला पत्रकाराचा जबाब आज नोंदवला जाणार आहे. तसंच उद्या तिला गोव्यामध्ये घेऊण जाणार असून तिथे मॅजिस्ट्रेटसमोर तिचा जबाब नोंदवला जाईल. त्यानंतरच गोवा पोलीस तरुण तेजपालची चौकशी करणार आहेत. तहलकाच्या कर्मचार्‍यांनी चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य केल्याचे पोलीस सांगत आहेत.

close