पाळत ठेवल्याप्रकरणी गुजरात सरकारची चौकशी समिती

November 26, 2013 1:56 PM0 commentsViews: 255

Image img_234292_modi2323_240x180.jpg26 नोव्हेंबर : विरोधक आणि प्रसारमाध्यमांमधून टीकेची झोड उठल्यानंतर गुजरात सरकारने अखेरीस तरुणीवर पाळत ठेवल्याप्रकरणी चौकशी समिती नेमली आहे. तीन महिन्यात या प्रकरणाचा अहवाल दे्ण्याचे आदेश गुजरात सरकारने दिले आहे.

 
नरेंद्र मोदींचे विश्वासू साथीदार अमित शाह यांनी सरकारी यंत्रणांना बंगळुरुमधील आर्किटेक्ट तरुणीवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले होते. हा प्रकार उघड झाल्यावर काँग्रेससह विविध महिला संघटनांनी मोदी आणि शाह यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.  सोमवारी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सीपीआयच्या नेत्यांनी राष्ट्रपती भवनाबाहेर निदर्शने केली होती.

 

वाढत्या दबावानंतर गुजरात सरकारने या प्रकरणात द्विसदस्यीय चौकशी समितीचे नेमणूक केली आहे. हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश एस.के.भट यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे.

close