सत्ता आल्यावर पाहून घेऊ -उद्धव ठाकरे

November 26, 2013 3:07 PM0 commentsViews: 2781

Image img_223792_udhavthakareback_240x180.jpg26 नोव्हेंबर : आमचं आव्हान स्विकारण्याची ताकद काँग्रेसमध्ये राहिली नाहीय. म्हणून त्यांनी पोलिसांना नोकरासारखं वागवलंय. मी सगळ्या पोलिसांना दोषी धरत नाही. पण खास करून ज्या ज्या पोलिसांनी सुपारी घेऊन आमच्यावर हल्ला केला त्यांचा नुसता निषेध करणार नाही. जरा थोडे दिवस थांबा उद्याचं सरकार आमचंच असणार आहे. आम्हीही ‘ब्लॅक लिस्ट’ तयार केलीय अशी धमकी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट पोलिसांना दिलीय.

तसंच कोकणात विकास कुठे झाला ते दाखवा असा टोलाही उद्धव यांनी राणेंना लगावला. राष्ट्रवादीची कोकणात उरलेली ताकद वाचवायची असेल तर आर.आर.पाटलांनी कारवाई केली पाहिजे अशी टीकाही उद्धव यांनी यावेळी केली.

रविवारी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात जखमी झालेल्या शिवसैनिकांना भेटण्यासाठी आज उद्धव ठाकरे कणकवलीत आहे. जखमी कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेच्या शाखेवर उद्धव यांनी कार्यकर्त्यांची पाठराखण करत उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.

तर उद्धव यांनी शिवसेनेची आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. जर दोन हात करायचेच असेल उद्धव यांना नारायण राणेंशी करावे राष्ट्रवादीवर टीका करू नये असं प्रतिउत्तर राष्ट्रवादीचे कार्याध्याक्ष जितेंद आव्हाड यांनी दिलं.

close