न्यूझीलंड दौरा टीम इंडियासाठी खडतर -सचिन

February 12, 2009 12:40 PM0 commentsViews: 1

11 फेब्रुवारी मुंबईत एका कंपनीच्या कार्यक्रमाला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हजर होता. ह्या कार्यक्रमानंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आगामी न्यूझीलंड दौरा भारतीय टीमसाठी खडतर असेल, असं तेंडुलकरने म्हटलंय. न्यूझीलंडसारख्या फॉर्ममध्ये असलेल्या टीमला त्यांच्याच भूमीत हरवणं नक्कीच सोपं नाही, असं त्याने सांगितलं. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौ-यात भारतीय टीमने 4-1ने विजय मिळवला.या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड दौरा तितकासा सहज सोपा असणार नाही असं त्याला वाटतं.श्रीलंका दौ-यात सचिन स्वत: तीनदा दुदैर्वीरित्या एलबीडब्ल्यू झाला. अंपायरच्या त्या निर्णयाबद्दल बोलताना त्याने रेफरल सिस्टिमवर नाराजी व्यक्त केली. हॉक आय सिस्टिम रेफरलपेक्षा चांगली आहे, असं तो म्हणाला. आयसीसीच्या नियमानुसार अंपायरच्या निर्णयाबद्दल मी जास्त बोलू शकत नाही, पण चुकीच्या निर्णयामुळे खेळाडू नक्कीच दुखावले जातात, असं तो म्हणाला.

close