गडचिरोलीत धानाच्या भरडाईत गैरव्यवहार

November 26, 2013 8:01 PM0 commentsViews: 73

महेश तिवारी , गडचिरोली

26 नोव्हेंबर : गडचिरोलीसह पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतलं जातं. त्याची भरडाई करून तांदूळ तयार करण्याचे काम आदिवासी विकास महामंडळाने 43 भात गिरण्यांना दिलं आहे. पण, हे काम दिले जात असताना नियम डावलण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारला कोट्यावधी रुपयांचा फटका बसल्याचे उघड झाले आहे. याच आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या कोट्यावधी रूपयांच्या धान्याची उचल न झाल्याने त्याची माती झाल्याचा प्रकार अगदी अलिकडचा आहे. त्यातच आता भाताच्या भरडाईच्या गैरव्यवहाराचे प्रकरण उघड झाले आहे. आधी दिलेल्या धान्याची भरडाई होण्यापूर्वीच त्यांना पुन्हा काम देण्यात आले आहे. तसंच स्थानिक गिरण्यांना काम देण्याचा आदेश असतानाही, गोंदिया आणि भंडारा इथल्या गिरण्यांना भरडाईचे काम देण्यात आलं. धान संकलन केंद्र आणि भात गिरणी यातले अंतर वाढून वाहतुकीचा खर्च वाढतो. 2005 मध्ये धानासंदर्भातला लेवी घोटाळा उघड झाल्यानंतर त्यात दोषी आढळलेल्या भात गिरण्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते. त्यातल्याच काही कंपन्यांना भरडाईचे काम देण्यात आले आहे.

पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होत गडचिरोली जिल्ह्यात एकाधिकार योजनेत आदिवासी विकास महामंडळ आदीवासी शेतकर्‍याकडून धानाची खरेदी करते या धानाची भरडाई करून भात तयार करण्याचे काम आदिवासी विकास महामंडळ भात गिरण्यांकडून करते यावर्षी तब्बल 43 भात गिरण्यांना भरडाईचं काम देण्यात आलं. आदीवासी विकास महामंडळानं भरडाईचं काम देण्यासाठी असलेल्या नियमांना पूर्णपणे बगल दिल्याचं स्पष्ट झाल आहे.

नियमाप्रमाणे भात गिरणी मालकाला 5 लाखाच्या बँक गँरटीवर फक्त 400 क्विंटल पर्यंत धान्य भरडाईला देता येते. मात्र 5 लाखाच्या बँक गॅरटींवर एकेका भात गिरणी मालकाला एक हजार क्विंटलपेक्षा जास्त असे एकूण 4 लाख 25 हजार क्विंटल धान्य भरडाईला देण्यात आल्यांन सरकारला कोट्यावधी रूपयांचा फटका बसलाय.

टाकून 10 पेक्षा जास्त भात गिरणी मालकावर फौजदारी गुन्हे दाखल झाले होते. मात्र त्यातल्या काही जणांना भरडाईचे काम देण्यात आले आहे. या 4 लाख 25 हजार क्विंटल धानाच्या भरडाईसाठी तब्बल 500 कोटी रक्कम आवश्यक असताना केवळ 2 कोटी 32 लाखाच्या रकमेवर हे काम देण्यात आल्यानं मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे

उल्लेखनीय म्हणजे आदिवासी महामंडळाने खरेदी केलेल्या 100 कोटीच्या धान्याची उचल न झाल्याने अनेक ठिकाणी त्या धान्याची माती झाली आहे. आता परत धान भरडाई घोटाळा उघड झाल्याने आदिवासी महामंडळांन दोन वरिष्ठ अधिकार्‍यांची बदली केली आहे.

close