आधी साहेबांचं स्मारक बांधा मग लोकांची थडगी बांधावी-राणे

November 26, 2013 8:17 PM1 commentViews: 2172

Image naryan_rane_+_udhav_thakare_300x255.jpg 26 नोव्हेंबर : लोकांची थडगी बांधण्याची भाषा करू नये अगोदर त्यांनी बाळासाहेबांचं स्मारक बांधावं आणि मग लोकांची थडगी बांधावी, शिवसेनेत त्यावेळेसही काहीही करू शकत नाही आताही काही करू शकत नाही अशी खरमरीत टीका उद्योगमंत्री नारायणे राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

तसंच पोलिसांनी शिवसैनिकांवर लाठीमार केला तो काही मुद्दाम नाही. शिवसैनिक काही सामाजिक कार्य करायला गेले नव्हते त्यांनी पोलिसांवर हल्ला केला म्हणून पोलिसांनी चोपून काढले असं सांगत राणेंनी पोलिसांनी बाजू घेतली.

कणकवलीत शिवसैनिकांना लाठीमार प्रकरणी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कणकवलीत जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी पोलिसांच्या कारभाराचा ठाकरे शैलीत समाचार घेतला.आमचं आव्हान स्विकारण्याची ताकद काँग्रेसमध्ये राहिली नाहीय. म्हणून त्यांनी पोलिसांना नोकरासारखं वागवलंय. मी सगळ्या पोलिसांना दोषी धरत नाही. पण खास करून ज्या ज्या पोलिसांनी सुपारी घेऊन आमच्यावर हल्ला केला त्यांचा नुसता निषेध करणार नाही.

जरा थोडे दिवस थांबा उद्याचं सरकार आमचंच असणार आहे. आम्हीही ‘ब्लॅक लिस्ट’ तयार केलीय अशी धमकी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट पोलिसांना दिलीय. तसंच कोकणात विकास कुठे झाला ते दाखवा असा टोलाही उद्धव यांनी राणेंना लगावला. उद्धव यांच्या टीकेचा राणेंनी खरपूस समाचार घेत कडाडून टीका केली.

  • Shital Savekar

    doghe pan basa nuste bo(mb)lat.. vikas gela khaddyat!!

close