नागपुरात लष्कराच्या मिसाईल रेजिमेंटमध्ये स्फोट, एक जवान शहीद

November 26, 2013 9:45 PM0 commentsViews: 212

nagpur news26 नोव्हेंबर : नागपूरजवळच्या कामठीमधल्या भारतीय लष्कराच्या फोर मिसाईल रेजिमेंट येथे सोमवारी स्फोट झाला. पृथ्वी मिसाईलचे ट्रेनिंग सेंटर असणार्‍या मिसाईल रेजिमेंटमध्ये प्रात्यक्षिक करताना हा स्फोट झाला.

या स्फोटामध्ये सलिम वाईकर या जवानाचा मृत्यू झाला तर सहा जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना आर्मी मेडीकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सोमवारी संध्याकाळी 5.45 मिनिटांनी हा स्फोट झाला होता. हा अपघात आहे की घातपात याची चौकशी लष्कराच्या वतीने सुरु करण्यात आली आहे.

close