महागाई दर खाली आला

February 12, 2009 1:09 PM0 commentsViews: 2

11 फेब्रुवारी महागाईच्या दराचा आलेख दिवसेंदिवस खाली घसरतो आहे. 31 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात महागाई दर 4.39 टक्के इतका खाली उतरला आहे. यावेळी महागाई दर 5 टक्क्यांहून कमी झाला आहे. प्रामुख्यानं पेट्रोलियम पदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे हा फरक पडल्याचं तज्ज्ञ म्हणत आहेत. गेल्या 24 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात महागाईचा दर 5.07 टक्के झाला होता.देशातल्या औद्योगिक उत्पादनाच्या दराची आकडेवारी जाहीर झाली. हा दर निगेटिव्ह झाला आहे. औद्योगिक उत्पादनाचा दर पोचला -2 टक्क्यांवर. तसंच इतर कन्झ्यूमर गुड्स, कॅपिटल गुड्स, कन्झ्यूमर ड्युरेबल्स क्षेत्रांचीही आकडेवारीही निगेटिव्ह झाली आहे. कन्झ्यूमर ड्युरेबल्सची आकडेवारी आहे -12.8% तर कॅपिटल गुड्स क्षेत्राचा प्रगतीचा दर आहे 4.2 टक्के. खाणक्षेत्राचं उत्पादन 5 टक्क्यांवरून 1 टक्क्यावर आलं आहे.

close