शंकररामन हत्याकांड : शंकराचार्य यांच्यासह २४ आरोपींची निर्दोष मुक्तता

November 27, 2013 10:55 AM0 commentsViews: 510

Sankaracharya_2011030527 नोव्हेंबर :  9 वर्षांपूर्वी देशात खळबळ उडवून दिलेल्या कांची मंदिरातल्या पुजार्‍याच्या हत्या प्रकरणाचा आज निकाल लागला.  प्रमुख आरोपी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्यासह २४ आरोपींना पाँडीचेरी उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे.

 

कांचीपुरम येथील वरदराजपेरुमल मंदिराचे व्यवस्थापक असलेले शंकररमण यांची मंदिराच्या संकुलात ३ सप्टेंबर २००४ रोजी हत्या करण्यात आली होती.

 

तब्बल नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याची सुनावणी, युक्तिवाद व प्रतियुक्तिवाद पूर्ण झाला असून, पुडुचेरी येथील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश सी. एस. मुरुगन या प्रकरणी आपला निकाल  आज जाहीर केला.

 

शंकररमण यांच्या पत्नी आणि मुलगीला आरोपींची ओळख न पटल्याने व  सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने  शंकराचार्या  जयेंद्र सरस्वती यांच्यासह  इतर 24 आरोपींची ही निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात एकूण 83 साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली होती.

 

 

 

close