विंडीजचा फडशा,भारताने मालिका जिंकली

November 27, 2013 5:06 PM0 commentsViews: 1102

dhavan27 नोव्हेंबर : टेस्ट मॅच पाठोपाठ भारताने वेस्ट इंडीज टीमला धूळ चारत वन डे सिरीजही खिश्यात घातली. कानपूरमध्ये झालेल्या तिसरी वन डे मॅचमध्ये टीम इंडियानं 5 विकेटनं वेस्ट इंडीजचा दणदणीत पराभव केला. या विजयाबरोबरच भारतानं विंडीजविरुद्धची ही सीरिज 2-1 नं जिंकली आहे. विंडीजने दिलेल्या 263 धावांचं आव्हान भारताने 47 व्या ओव्हरमध्येच 264 धावा करून पूर्ण केलं.. या मॅचेचा शिल्पकार ठरला तो शिखर धवन. धवनच्या धडाकेबाज 119 धावांच्या शतकी खेळीवर भारताने विंडीजला पराभूत तर केलेच पण मालिकाही जिंकली.

भारताने टॉस जिंकून यजमान संघाला पहिल्या बॅटिंगची संधी दिली. पहिली बॅटिंग करणार्‍या वेस्ट इंडिजनं 5 विकेट गमावत 263 रन्स ठोकले. कायरन पॉवेल आणि मार्लन सॅम्युअल्सच्या तुफानी बॅटिंगच्या जोरावर विंडीजनं भारतासमोर 264 रन्सचं टार्गेट ठेवलं. पॉवेलनं 70 तर सॅम्युअल्सनं 71 रन्स केले. तर त्यानंतर आलेल्या डॅरेन ब्राव्होनंही शानदार हाफ सेंच्युरी ठोकत 51 रन्स केले. भारतातर्फे आर. अश्विननं 2 तर शमी, भुवनेश्वर आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 1 विकेट घेतली.

263 धावांच्या पाठलाग करणार्‍या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. तडाखेबाज फलंदाज रोहित शर्मा फक्त 4 रन्स करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. पण शिखर धवनच्या झंझावातापुढे विंडिजचे बॉलर्स निष्प्रभ ठरले. धवननं 95 बॉल्समध्ये 20 फोर ठोकत 119 रन्स केले. त्याला चांगली साथ दिली ती युवराज सिंगनं. युवराजनं पुन्हा एकदा फॉर्मात येत हाफ सेंच्युरी ठोकली. युवराजनं 7 फोर ठोकत 74 बॉल्समध्ये 55 रन्स केले. विंडीजतर्फे रवी रामपॉल आणि ब्राव्होनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. आपल्या तुफानी इनिंगच्या जोरावर शिखर धवन मॅन ऑफ द मॅच ठरला. भारताने वन डेची मालिका 2-1 ने खिश्यात घातली.

close