ऊस पेटला, राज्यात 48 तास बंदची हाक

November 27, 2013 7:05 PM2 commentsViews: 2060

Highway28 नोव्हेंबर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊसदराच्या प्रश्नावर केलेल्या आंदोलनानं आता हिंसक वळण घेतलंय. संघटनेनं ऊसाच्या प्रश्नावर उद्यापासून राज्यभरात 48 तासांच्या कडकडीत बंदचं आवाहन केलंय. जर बंद होऊ द्याचा नसेल तर राजू शेट्टींनी सरकारला दोन दिवसांची मुदत दिलीय.

कराडमध्ये राजू शेट्टींची सभा झाली या सभेनंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. कराडमध्ये मुंबई-बंगळुरू हायवेवर त्यांनी वाहनांवर दगडफेक केली, दुधाचा टँकर पेटवून दिला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यामुळे मुंबई-बंगळुरू हायवेवर तणाव निर्माण झालाय. उद्या गुरूवारी सकाळी सात वाजल्यापासून संघटनेनं 48 तासांचा बंद पुकारलाय. बंदचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ देऊ नका असं आवाहनही शेट्टी यांनी केलं. मात्र तरीही संघटनेचा आक्रमक पवित्रा पाहता, सरकारलाही काळजीपूर्वक पावलं उचलावी लागणार आहेत. आज सकाळपासून स्वाभिमानीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे.

सांगलीतल्या नांद्रे गावात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढुन दहन करण्यात आलं. तसंच नांद्रे,वसगडे,ब्राम्हणाळ,ताकारी आणि तुपारी या गावात कडकडीत बंद पाळण्यात आलाय. तर कराडमधल्या तासगाव-कराड मार्गावर तुपारी फाट्याजवळ रास्ता रोको करण्यात आला. या मार्गावरची वाहतूक ठप्प झालीये. सांगली जिल्ह्यातल्या मांजर्डे,वायफळे,बोरगाव,येळावी आणि कवठेएकंद या सारख्या अनेक गावात रास्तारोको करुन वाहतूक ठप्प करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ऊस दरवाढ प्रश्नी राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारनंही वाटाण्याच्या अक्षता लावल्या. दिल्लीमध्ये झालेली सर्वपक्षीय चर्चा निष्फळ ठरल्यानंतर या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. आता लवकरच मार्ग निघेल असा विश्वास केंद्रीय कृषीराज्यमंत्री तारीक अन्वर यांनी व्यक्त केलाय.

बस पेटवण्याचा प्रयत्न

उस्मानाबाद जिल्ह्यातही ऊसदर आंदोलन पेटलंय. परंडा तालुक्यातल्या लोणी गावात मंगळवारी रात्री बसची हवा सोडून बस पेटवण्याचा प्रयत्न केला. गावातल्या लोकांनी पेट घेतलेली बस वेळीच विझवल्यानं मोठा अनर्थ टळला. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचं पोलीस सांगत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अजून कुणालाही ताब्यात घेतलेलं नाही. शेतकर्‍यांचं आंदोलन जरी सुरू असलं तरी जिल्ह्यातले सर्व साखर कारखाने मात्र सुरू आहेत.

  • Vishwanath Mali

    Aandolanamule 50% peksha jast vidyarthi aajache university paper attend karu shakale naahit. Yala jabajdar kon?
    Jar aandolanach karayache aahe tar sarvsamanya jantela ka vethis dharta? Pudharyanchay gharasamor aandolan kara.

  • Vishwanath Mali

    Aandolanamule 50% peksha jast vidyarthi aajache university paper attend karu shakale naahit. Yala jabajdar kon?

    Jar aandolanach karayache aahe tar sarvsamanya jantela ka vethis dharta? Pudharyanchaya gharasamor aandolan kara.

close