कानडी गुंडगिरी, संभाजी पाटलांच्या कार्यालयावर भ्याड हल्ला

November 27, 2013 7:57 PM0 commentsViews: 872

belagon hall27 नोव्हेंबर : बेळगावमध्ये पुन्हा एकदा मराठीजणांच्या विरोधात कानडी वरंवट्याची कटकट सुरु झालीय. बेळगावचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील यांच्या बेळगाव महापालिकेतल्या कार्यालयावर कन्नड रक्षण वेदिकेच्या महिला कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला करून सामानाची मोडतोड करून काळे फासलं.

बेळगावात सध्या कर्नाटक विधी मंडळांचं हिवाळी अधिवेशन सुरू असून विधानसभेत मराठी बाणा दाखविल्याबद्दल आणि महामेळाव्यात कर्नाटक सरकार विरोधात वक्तव्य केल्याचा आरोप करून कन्नड रक्षण वेदिकेने हा हल्ला केला आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शहरातील कॅम्पमधल्या मराठी भाषिक युवा आघाडीच्या कार्यालयाची मोडतोड केली. दुसर्‍या दिवशी बंगळुरू मधल्या आमदार निवासाच्या कक्षाची तोडफोड केली. आज बुधवारी पुन्हा महापालिकेतल्या कक्षाचीही तोडफोड केली आहे. सीमा भागातील मराठी माणसाने या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.

close