‘लोकपाल’साठी अण्णांचा एल्गार,10 डिसेंबरपासून उपोषण

November 27, 2013 7:19 PM1 commentViews: 602

anna hazare_new27 नोव्हेंबर : ज्या लोकपाल विधेयकामुळे अख्खा भारत ढवळून निघाला होता. आता पुन्हा एकदा या आंदोलनाचे जनक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

लोकपाल विधेयक मंजूर करा या मागणीसाठी अण्णा हजारे उपोषणाला बसणार आहे. वर्ष उलटले तरीही या सरकारला लोकपाल विधेयकाबद्दल काहीही घेणे देणे नाही अशी टीका करत अण्णांनी उपोषणाची घोषणा केलीय. येत्या 10 डिसेंबरपासून अण्णा आपल्या गावी राळेगणसिद्धीमध्येच उपोषणाला बसणार आहे.

येत्या हिवाळी अधिवेशनात लोकपाल विधेयक मंजूर करा अशी मागणी अण्णांनी केली आहे. तसंच अण्णांनी या आंदोलनात कोणत्याही राजकीय पक्षाला स्थान नसणार असं स्पष्ट करत आंदोलनाचे माजी सदस्य आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासाठी दार बंद केलंय.

केजरीवाल यांनी पक्ष काढण्याची घोषणा केल्यानंतर अण्णांनी आपल्या टीमचं विसर्जन केलं होतं. त्यानंतर अण्णांनी लोकपाल विधेयकासाठी एकटाने लढा देण्याचा निर्णय घेतला होता. शेवटच्या श्वासापर्यंत लोकपाल विधेयकासाठी लढा देत राहिल असं अण्णा नेहमी आपल्या भाषणातून सांगत आले आहे. आता पुन्हा एकदा अण्णांनी लोकपालसाठी उपोषणाचा निर्धार केलाय.

  • CHANDRAKANT VAJPEYI

    समाधान आहे कि जनलोकपाल बिला साठी थोर समाज सेवक अण्णा हजारे नी दिनांक ०५ एप्रिल २०११ पासून आत्ता पर्यन्त जितकी उपोषणे केली, प्रत्येक वेळी औरंगाबाद कलेक्टर ऑफिस समोर किंवा पुणे येथे [ कमला आर्किड, जे. एम. रोड वर ] प्रामाणिक उपोषण करून मी माझा सहभाग नोंदविला.

    आनंद होतो कि देशाच्या हितासाठी आवश्यक पण टाळाटाळ करुन संसद मध्ये लंबित ठेवलेल्या लोकपाल बिलास मंजूरी मिळविण्यासाठी मी स्वत: येत्या १० डिसेम्बर २०१३ पासून अण्णां सोबत राळेगण येथे पुन: बेमुदत उपोषण करणार आहे.

    विश्वास आहे कि ” आता ‘ लोकपाल विधेयकास ‘ संसद मधून मंजूरी मिळाल्यावरच आंदोलनाची आणि उपोषणाची सांगता होईल.” कारण आपले शुभचिंतन व पाठबळ आम्हास लाभणार आहे यांत शंका नाही.

close