कुंभमेळा: संभाजी ब्रिगेडचं साधूंना खुल्या चर्चेचं आव्हान

November 27, 2013 8:31 PM2 commentsViews: 1211

nashik kumbha mela27 नोव्हेंबर : नाशिकमध्ये 2015 मध्ये होणार्‍या कुंभमेळ्यावरचा ‘खर्च निरर्थक की सार्थक’ या विषयावरून वाद सुरू झालाय. कुंभमेळ्यासाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.

मात्र, कुंभमेळ्यासाठी एवढा खर्च करण्यास छत्रपती संभाजीराजे यांनी विरोध दर्शवला आहे. या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेडनं साधू महंतांना खुल्ल्या चर्चेचं आव्हान दिलंय.

डिसेंबरमध्ये संभाजी ब्रिगेड त्र्यंबकेश्वरला आमने सामने परिषदेचं आयोजन करणार आहे. यात ब्रिगेडचे पदाधिकारी आणि साधुमहंत आमने सामने चर्चा करणार आहेत. छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षण परिषदेत कुंभमेळ्यावरच्या खर्चाला विरोध दर्शवला होता, त्यावर हे पडसाद आता उमटू लागले आहे.

  • Dharmic.

    Haj Subsidy la pan B-grade virodh karel ka?

  • Raju

    Sambhaji Brigade var aajeevan bandi ghala. Ya deshdrohi sanghatanevar Sambaji Rajanche naav vaparnyavar case kara. Yaa gundanchi layki aahe ka yavar bolaychi.

close