61 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 12 ते 15 डिसेंबरला

November 27, 2013 10:46 PM0 commentsViews: 332

bhimsen mahotsava27 नोव्हेंबर : पुण्यात 61 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 12 ते 15 डिसेंबर दरम्यान रमणबाग प्रशालेच्या मैदानावर पार पडणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच कोलकत्याच्या उद्योन्मुख गायिका इंद्राणी मुखर्जी यात गाणार आहेत.

तसंच पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पंडित राजा काळे यांचंही गायन होणार आहे. दक्षिणेतल्या प्रसिद्ध वीणावादिका जयंती कुमरेश खास कर्नाटक शैलीतील वीणावादन सादर करणार आहेत.

तर शोवना नारायण यांचं कथ्थक नृत्यही पाहता येणार आहे. या महोत्सवाची सुरुवात मधुकर धुमाळ यांच्या बासरीवादनानं होणार आहे. तर समारोप प्रभा अत्रे यांच्या गायनानं होईल. आर्य प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

close