बनावट पासपोर्ट प्रकरणी अबू सालेमला 7 वर्षांची शिक्षा

November 28, 2013 12:43 PM0 commentsViews: 262

Abu-Salem28 नोव्हेंबर : बनावट पासपोर्ट प्रकरणी गँगस्टर अबू सालेमला 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हैदराबादच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज गुरूवार हा निर्णय सुनावला.

 

सालेमवर 2001 मध्ये आंध्र प्रदेशमधल्या कर्नुलमध्ये बनावट पासपोर्ट तयार केल्याचा आरोप होता. 18 नोव्हेंबरला सालेमला याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. सालेम सध्या 1993 च्या बाँबस्फोट प्रकरणी तुरुंगवासात आहे.

close