परभणीत दलित महिलेला जिवंत जाळलं

February 13, 2009 7:54 AM0 commentsViews: 1

13 फेब्रुवारी, परभणीशेख मुजीब शेतीच्या वादातून वृद्ध महिलेला जिवंत जाळल्याची घटना परभणी जिल्ह्यातल्या साडेगावमध्ये घडलीये. तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झालाय. . याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. परभणी जिल्ह्यातल्या साडेगावमध्ये या महिलेला जाळण्यात आलं होतं. यशोदाबाई घोडके असं या महिलेचं नाव आहे. ही महिला नव्वद टक्के भाजली होती. यशोदाबाई घोडके यांचे पती विठ्ठलराव घोडके यांच्या नावावरच्या 32 एकर जमीनंसंदर्भात त्यांचा काजी यांच्याशी वाद आहे. काल याच वादातून शेतातली पिकं काढण्यासाठी आलेल्या काजीचा वाद यशोदाबाईंशी झाला. त्यानंतर यशोदाबाईच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्यात आलं.

close