निठारी हत्याकांडाचा निकाल लागला

February 13, 2009 10:50 AM0 commentsViews: 6

13 फेब्रुवारी, नवी दिल्ली दोन वर्षांपूर्वी गाजलेल्या निठारी हत्याकांडाचा निकाल लागलाये. निठारी हत्याकांडातील आरोपी मोनिंदर पंढेर आणि सुरिंदर कोहलीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीये. 14 वर्षांच्या रिंपा हलदर या मुलीचा बलात्कार आणि खून केल्याबद्दल मोनिंदर पंधेर आणि त्याचा नोकर सुरिंदर कोहली या दोघांनाही कोर्टानं काल दोषी ठरवलं होतं. दोन वर्षांपूर्वी दिल्लीजवळच्या निठारी या गावात पंधेर याच्या घरात 19 महिला आणि मुलांचे अवशेष सापडले होते. देशभर खळबळ माजवलेल्या या घटनेचा तपास नोएडा पोलीास योग्य पद्धतीन करू शकले नाहीत.. म्हणून तपासाची सूत्रं सीबीआयकडं सोपवण्यात आली होती. दोन वर्षंानंतर रिंपा हलदर या पंधेर याच्या मोलकरणीच्या केसचा निकाल लागलाय. रिंपा हिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याचं तसंच पुरावे मिटवण्याचे आरोप पंधेर आणि कोहली या दोघांवर सिद्ध झालेत.

close