मुंबईत मोफत वाय फाय

November 28, 2013 1:58 PM1 commentViews: 531

28 नोव्हेंबर : जगातल्या अनेक शहरांत महत्त्वाच्या भागांमध्ये फ्री वाय-फाय पुरवण्यात येते, आता मुंबईतही अशा प्रकारची मोफत वाय फाय सेवा देण्यात येणार आहे. याबद्दल काल महापौरांकडे एक सादरीकरण करण्यात आले. फोर्ट परिसरात ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येईल. सुरुवातीला महापालिका, हुतात्मा चौक, महात्मा गांधी मार्ग, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक आणि मुंबई स्टॉक एक्सेंज या परिसरात तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा दिली जाईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात ही सेवा पुरवली जाणार आहे.

 

एकुणच इंटरनेटचा वाढता वापर आणि सुरक्षाविषयक सुविधांसाठीचा इंटरनेटचा उपयोग या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबईत मोफत वायफाय सुविधा पुरवण्याचा विचार मुंबई महापालिकेने केला आहे. यासंदर्भात काल महापौरांच्या दालनात या मुद्द्यावर सादरीकरण करण्यात आल. सुरुवातीला फोर्ट परिसरात तीन महिन्यांसाठी ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे इंटरनेटचा सहज आणि मोफत वापर करणे शक्य होणार आहे. बंगळुरु मध्ये दोन महिन्यांपासून प्रायोगिक तत्वावर तीन चौरस किलोमीटर परिसरात वायफाय सुविधा देत असलेल्या डी-वॉईस ब्रॉड़बॅण्ड या खाजगी कंपनीने काल महापौरांच्या दालनात सादरीकरण केल.

 

त्यावेळी अतिरिक्त आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास उपस्थित होते.लवकरच ही सुविधा देण्यात येणार असल्याच महापौरांनी म्हटलं. सुरुवातीला महापालिके मागे, हुतात्मा चौक,महात्मा गांधी मार्ग,श्यामाप्रसाद मुखर्जी चौक,मुंबई स्टॉक एक्सेंज परिसरात तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर ही सुविधा दिली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात ही सेवा पुरविली जाणार आहे.सेंसर तसेच सीसीटिव्ही कॅमेरे लावून वायफाय सोबतच वाहतूक नियमन,पार्किंग व्यवस्थापन,सुरक्षाव्यवस्था,रस्त्यावरील दिव्याचे नियोजन,कचरा व्यवस्थापन सुविधाही राबविता येतील.या सुविधेअंतर्गत प्रत्येकाला 512 केबीपीएस किमान स्पीड देण्याचा प्रयत्न असणारेय.तर वायफाय वापरण्यासाठी मोबाईल क्रमांक हाच पासवर्ड असणार आहे.

  • Aparna

    Wifi kai vaatatayt, Mumbaicha kinara secure kara pahile!

close