दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करा – भारताची पाककडे ठाम मागणी

February 13, 2009 11:01 AM0 commentsViews: 3

13 फेब्रुवारी, नवी दिल्ली आशिष दीक्षितपाकिस्ताननं त्यांच्या देशातले दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले पाहिजेत अशी ठाम मागणी भारतानं केलीय. केंद्रीय परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत ही मागणी केली. मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्ताननं जी चौकशी केली त्याचा रिपोर्ट भारताला सोपवला. ही घटना सकारात्मक आहे असं मुखर्जी म्हणाले. मात्र पाकिस्तानी जमीनीचा दहशतवाद्यांकडून होणार्‍या वापरामुळं जगाला त्रास होतोय असं त्यांनी सांगितलं. मुंबई हल्ल्यातले अतिरेकी पाकिस्तानीच असल्याची कबुली काल पाकिस्ताननं दिली होती. त्यावर आज परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी संसदेत उत्तर दिलं. पाच जानेवारीलाच पाकिस्तानला सर्व पुरावे दिल्याचं मुखर्जीनी सांगितलं. तर पाकिस्तानही दहशतवादाविरोधात उभं राह्यला हवं, असं आवाहनही मुखर्जी यांनी केलं.

close