दाभोलकरांच्या खुनामागे धर्मांध शक्तींचा हात नाही !

November 29, 2013 3:30 PM0 commentsViews: 1287

narendra dabholkar29 नोव्हेंबर :डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी पुणे गुन्हे शाखेनं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. दाभोलकरांच्या खुनामागे कोणत्याही धर्मांध शक्तीचा हात नसल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं.

 

त्यामुळे दाभोलकरांच्या खुनाचं गूढ आता आणखी वाढलंय. दाभोलकरांना धमक्या आलेल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं नव्हतं असंही पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.

 

दाभोलकर यांचा 20 ऑगस्टला पुण्यात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. दाभोलकर यांच्या खुनाप्रकरणी केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर पुणे गुन्हे शाखेनं हे प्रतिज्ञापत्र सादर केलंय.

close