पोलीस कॉन्स्टेबलने वाचवले विनोद कांबळीचे प्राण

November 29, 2013 11:27 AM0 commentsViews: 3628

Image img_65222_vinodk_240x180.jpg29 नोव्हेंबर : भारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना वांद्र्यातल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

गाडी चालवत असताना विनोद यांच्या छातीत कळ येऊ लागल्याने त्याना तातडीने लीलावती हॉस्पिटलच्या क्रिटीकल केअर युनीटमध्ये दाखल करण्यात आले. एका पोलिस कर्मचार्‍याच्या लक्षात येताच त्याने कांबळी यांना वेळीच हॉस्पिटल मध्ये दाखल केल्याने विनोद यांचा जिव वाचण्यास मदत झाली.

 विनोद यांच्यावर सध्या वैद्यकिय उपचार सुरु आहे असून त्यांची प्रकृ तीत सुधारणा असल्याची माहीती मिळाली आहे.

close