न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारतीय संघ जाहीर

February 13, 2009 11:57 AM0 commentsViews: 1

13 फेब्रुवारी न्यूझीलंड दौर्‍यात खेळल्या जाणार्‍या टेस्ट, वन-डे आणि ट्वेन्टी-20 साठी भारतीय टीमची निवड करण्यात आलीय. चेन्नईला झालेल्या निवड समितीच्या बैठकीत ही घोषणा झालीये. रणजीमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा मुंबईचा फास्ट बॉलर धवल कुलकर्णीनं भारतीय टेस्ट टिममध्ये जागा पटकावलीय. पहिल्यांदाच तो टेस्ट टिममध्ये पदार्पण करतोय तर एम. विजय, लक्ष्मीपती बालाजी आणि दिनेश कार्तिकनंही टीममध्ये पुनगरागमन केलंय. त्याचप्रमाणे दुखापतीमुळे श्रीलंका दौरा न खेळू शकणार्‍या हरभजन सिंगचाही टीममध्ये समावेश करण्यात आलाय. द्रविड आणि लक्ष्मणनं टेस्ट टीममधली आपली जागा कायम ठेवलीय. दिनेश कार्तिकची टी – 20 टीममध्येही निवड करण्यात आलीय. न्यूझीलंड दौ-यासाठी निवडलेला भारतीय संघ पुढीलप्रमाणे – महेंद्रसिंग धोणी, वीरेन्द्र सेहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस लक्ष्मण, युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग, ईशान्त शर्मा, मुनाफ पटेल, अमित मिश्रा, दिनेश कार्तिक, लक्ष्मीपती बालाजी, धवल कुलकर्णी आणि मुरली विजय.श्रीलंका दौर्‍यावर गेलेली भारतीय टीम वनडे आणि ट्वेन्टी-20 मॅचसाठी कायम ठेवण्यात आलीय. यात दिनेश कार्तिकचा समावेश हा एकमात्र बदल करण्यात आलाय.

close