सोशल मीडियाच्या ‘खांद्यावर’ राजकीय पक्षांची बंदूक !

November 29, 2013 4:27 PM0 commentsViews: 543

social media29 नोव्हेंबर : आयटी कंपन्या आणि राजकीय पक्षांमधलं संगनमत असल्याचं कोब्रापोस्ट वेबसाईटनं उघड केलं. ऑपरेशन ‘ब्लू व्हायरस’ या नावानं हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आलंय. राजकीय प्रतिस्पर्ध्यांना बदनाम करण्यासाठी आणि खोटे फॉलोअर्स तयार करण्यासाठी ऑनलाईन सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो असं या कोब्रापोस्टनं सिद्ध केलंय.

तसंच मतं एका विशिष्ट बाजूला वळवण्यासाठी धार्मिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी गावठी बॉम्बचे स्फोट घडवण्याचीही या आयटी कंपन्यांची तयारी होती. प्रतिस्पर्ध्यांना बदनाम करण्यासाठी राजकीय नेते पैशांचाही वापर करतात. त्यासाठी काही लाख रुपयांपासून काही कोटी रुपये मोजले जातात.

विशेष म्हणजे निवडणुकीच्या आधी आपल्या क्लायंटची मतंही विकत घेता येतील असा दावा या आयटी कंपन्यांनी छातीठोकपणे केलाय.

दोन वर्षांपुर्वी सोशल मीडियाचा वापर करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं आंदोलन चांगलंच गाजलं होतं. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पत्र स्थापन केला आणि यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केलाय. आम आदमीचा सोशल फंडा पाहून इतरही राजकीय पक्षांनी सोशल मीडियाचा वापर करण्यात सुरूवात केली.

close