नाराज नेत्यांनी खुशाल शिवसेना सोडावी -उद्धव ठाकरे

November 29, 2013 5:42 PM0 commentsViews: 2181

udhav on joshi28 नोव्हेंबर : मला अस्तनीतले निखारे नको, अशा निखार्‍यांवर पाणी टाकावे लागेल ते मी करणार नाही त्यामुळे जे शिवसेनेत नाराज आहे, पक्षाच्या नेतृत्वावर नाराज आहे त्यांनी खुशाल शिवसेना सोडून बाहेर जावं, मी त्याना अडवणारही नाही असा गंभीर इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

तसंच जे कडवट शिवसैैनिक आहे ज्यांच्या बळावर आज शिवसेना आहे, त्यांच्या विश्वासावर महाराष्ट्रात सत्ता आणून दाखवले असा विश्वासही उद्धव यांनी व्यक्त केला. एका प्रकारे उद्धव यांनी मनोहर जोशी यांचं नाव न घेता पंतांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

दसर्‍या मेळाव्याच्या नाराजीनाट्यानंतर उद्धव यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर आपली सडेतोड भुमिका मांडली. आज शुक्रवारी मातोश्रीवर नाराज नेत्यांच्या संदर्भात आणि विशेष करुन नेतृत्वावर टीका करणार्‍या नेत्यांबद्दल काय भुमिका घ्यावी याबद्दल बैठक पार पडली. या बैठकीनंतर नाराज नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी गंभीर इशारा दिलाय. या बैठकीत मनोहर जोशी, लीलाधर डाके, रामदास कदम, सुभाष देसाई, दिवाकर रावते हे नेते उपस्थित होते.

close