प्रेमिकांच्या पाठीशी नितेश राणे

February 13, 2009 12:18 PM0 commentsViews: 2

13 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी एक चांगली बातमी. व्हॅलेंटाईन डे ला विरोध करणार्‍यांच्या विरोधात आता नितेश राणे यांची स्वाभिमान संघटना उभी ठाकणार आहे. माजी महसूलमंत्री नारायण राणे यांचे नितेश राणे पुत्र आहेत. प्रेमिकांना कुणा संस्कृतीरक्षकानं त्रास दिला तर त्याला पोलिसांच्या हवाली करण्याचं काम स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते करतील अशी घोषणा नितेश राणे यांनी केलीय. श्रीराम सेनेनं जर मुंबईत गडबड केली तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय.

close