तेजपालला अखेर अटक

November 30, 2013 9:19 PM0 commentsViews: 502

tejpal news30 नोव्हेंबर :  लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपालला अटक होणार की जामीन मिळणार यावरुन अखेर पडदा उठला आहे. कोर्टाने तरुण तेजपाल याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे तेजपालला गोवा पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

रात्री 8 वाजताच्या सुमारास कोर्टाने हा निकाल दिला. आधी आम्ही कोर्टाची ऑर्डर वाचू आणि त्यानंतर तेजपालला अटक करू अशी भूमिका गोवा पोलिसांनी घेतली होती त्यामुळे काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या काळात तेजपाल क्राईम ब्रँचच्या ताब्यात होता. अखेरीस पोलिसांनी तेजपालला अटक केली. उद्या पुन्हा एकदा कोर्टात तेजपालला हजर केले जाणार आहे.

ही केस संवेदनशील आहे आणि त्यामुळे तेजपालची कोठडी आवश्यक आहे असं गोवा पेलिसांनी कोर्टानं सांगितलं. आज सकाळी तेजपालच्या जामीन अर्जावर गोव्यातल्या सेशन्स कोर्टात सुनावणी झाली. पण न्यायाधिशांनी आपला निकाल राखून ठेवला होता. सरकारी वकिलांनी तेजपालची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्याला तेजपालच्या वकिलांनी विरोध केला. तेजपाल तपासात सहकार्य करत असल्यानं पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद

 1. - तेजपालनं पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि तपासापासून पळून जाण्याचा प्रयत्न केला
 2. - तेजपालला 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यायला हवी
 3. - पीडितेच्या जबाबात कोणताच बदल नाही, तेजपालनं वेळोवेळी निवेदन बदललं
 4. - पीडितेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून तेजपालनं तिच्या जखमेवर मीठ चोळलं
 5. - आरोपी तपासकार्यात ढवळाढवळ करण्याची शक्यता आहे
 6. - आरोपीनं पीडितेच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला
 7. - पीडितेच्या जबाबानुसार ही बलात्काराची केस होऊ शकते
 8. - सीसीटीव्ही फूटेजवरून गुन्ह्याची तीव्रता स्पष्ट होते
 9. - या गुन्ह्यासाठी 10 वर्षांपेक्षा कमी शिक्षा नाही

तेजपालच्या वकिलांचा युक्तिवाद

 1. - तेजपाल तपासात सहकार्य करतोय, मग त्याच्या कोठडीची काय गरज?
 2. - हे प्रकरण विशिष्ट हेतूनं प्रेरीत आहे
 3. - या प्रकरणात तेजपालच्या कोठडीची गरज नाही
 4. - तेजपाल गोव्यात 2-3 आठवडे राहू शकतो आणि गरज लागेल तेव्हा चौकशीसाठी हजर राहू शकतो
close