फ्रायडे रिलिज

February 13, 2009 12:42 PM0 commentsViews: 9

13 फेब्रुवारी हा वीकेण्ड खास वीकेण्ड आहे. कारण व्हॅलेंटाइन डेटं वारं सगळीकडे वाहायला लागलंय. त्यामुळे सगळीकडे प्रेमाचा, सेलिब्रेशनचा मूड आहेच. आणि त्यासाठी सिनेमेही बरेच आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्लिश सगळीकडेच चांगले ऑप्शन आहेत. भरपूर चर्चा, वाद आणि पब्लिसिटी झालेला शाहरूख खानच्या प्रॉडक्शनचा बिल्लू हा या आठवड्यातला बॉलिवूडमधला मोठा सिनेमा. इरफान खान, लारा दत्ताची प्रमुख भूमिका, आणि सुपरस्टार रोलमध्ये खुद्द शाहरुखही आहे. एका सामान्य माणसाच्या आयुष्यात एक दिवस सुपरस्टार येतो आणि त्याचं आयुष्यच बदलून जातं, अशी सिनेमाची वन लाइन आहे. प्रियदर्शनचं दिग्दर्शन असल्यानं प्रेक्षकांच्या सिनेमाकडून भरपूर अपेक्षा आहेत.बॉलिवूडमध्ये दुसरा सिनेमा आहे तो म्हणजे द स्टोनमॅन मर्डर्स अरबाझ खान, के.के.मेनन, विक्रम गोखले यांच्या भूमिका आहेत. मनीष गुप्ताचं दिग्दर्शन आहे. त्याचं हे पहिलंच दिग्दर्शन आहे. त्यानं राम गोपाल वर्माच्या सरकारचं लेखन केलं होतं. एक सिरीयल किलर दगडांनी माणसांना ठार मारतो आणि मुंबई पोलीस त्याच्या मागे आहेत या सत्य घटनेवरचा हा सिनेमा आधारित आहे. हि इज जस्ट नॉट दॅट इनटु यु असं लांबलचक नाव असलेल्या सिनेमात आहेत प्रेमाच्या वेगवेगळ्या तर्‍हा. जेनीला लहानपणापासून असा समज असतो की जो पुरुष विचित्र वागतो, तो आपल्या प्रेमात असतो. यातूनच बर्‍याच व्यक्ती तिच्या आयुष्यात येतात.. जेनिफर ऍनिस्टन, बेन ऍफ्लेक आणि असे बरेच सुपरस्टार्स या सिनेमात आहेत. मराठीतही रोमँटिक सिनेमा रिलीज होतोय.. सावरिया डॉट कॉम.. राजेंद्र तालक यांचं दिग्दर्शन आहे. सुबोध भावे, अनिकेत विश्वासराव यांच्याबरोबर प्रियांका बिड्ये ही नवी हिरॉइन आहे. सिनेमाची थीम आहे इंटरनेटवर जुळणारी लग्नं. आणखी एक मराठी सिनेमा म्हणजे ' सालीनं केला घोटाळा '. एक धांदरट माणूस आणि त्याची संशयी बायको यावर सिनेमा बेतलाय. या विनोदी सिनेमाची कथा आहे शरद उपाध्येंची.. भरत जाधव , सिद्धार्थ जाधव प्रमुख भूमिकेत आहेत. व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी रोमँटिक सिनेमा निवडायचा, की मिळेल तो सिनेमा पाहायचा हा चॉइस आता तुमचाच आहे.

close