बलात्कारी नराधमाची बेदम धुलाई,गाढवावरुन काढली धिंड

November 30, 2013 9:40 PM0 commentsViews: 3319

30 नोव्हेंबर : सांगलीमध्ये चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या एका नराधमाला गावकर्‍यांनी चांगलाच चोप देत गाढवावरुन धिंड काढली. राहुल माने असं या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीने एका अल्पवयीन मुलीला नोकरीला लावून देतो असं आमीष देऊन सोलापूरला घेऊन गेला. तिला आठ दिवस एका खोलीत डांबून ठेवलं आणि तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणाची कुठे वाच्यात करू नये म्हणून त्याने पीडित मुलीला चाकूचा दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. आपल्या सोबत घडलेल्या प्रकारातून कसाबसा आपला जीव वाचवत या पीडित मुलीने शेजारी राहणार्‍यांना सांगून आपल्या वडिलांना फोन केलाय. त्यानंतर पीडितच्या वडिलाने भाजपच्या कार्यकर्त्यांची मदत घेऊन सोलापूर गाठले आणि राहुल मानेच्या तावडीतून मुलीची सुटका केली. सांगलीत आरोपाला आणल्यानंतर गावकर्‍यांनी बेदम चोप दिला आणि गाढवावरुन धिंड काढली. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

close