आव्हाडांचा दाभोलकर करू, आव्हाडांना फेसबुकवर धमकी

November 30, 2013 9:01 PM1 commentViews: 2506

jitendra awadha30 नोव्हेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांना फेसबुकवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात धर्मांध शक्तीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आव्हाडांना धमकी देण्यात आली.

 

दाभोलकरांच्या हत्येमागे कोणत्याही संघटनेचा हात नव्हता हे पोलीस तपासातून उघड झालंय. हिंदुत्वावादी संघटनाची बदनामी करणार्‍या आव्हाडांसारख्यांचा दाभोलकर करण्याची वेळ आली आहे अशी धमकी फेसबुकवरुन देण्यात आलीय. अत्यंत अर्वाच्च भाषेत ही धमकी देण्यात आलीय. मात्र ही धमकी कुणी दिली हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

 

विशेष म्हणजे या प्रकरणी शुक्रवारी पुणे क्राईम ब्रँचने प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. यात कोणतेही पुरावे नसल्यामुळे दाभोलकरांच्या खुनामागे धर्मांध संघटनेचा हात नाही असं स्पष्ट केलंय. दाभोलकरांच्या खुनानंतर धर्मांध संघटनेवर संशय व्यक्त केला जाता होता. दाभोलकरांच्या खुनाचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जाता होता त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनीही खुनाचा निषेध केला होता.

  • Ramesh Patil

    Hope Poice will act as quickly aS done in Palghar

close