राज्याची ‘अन्न सुरक्षा’ अडकली लालफितीत !

November 30, 2013 10:25 PM0 commentsViews: 252

food bill30 नोव्हेंबर : यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दृष्टीनं असलेली महत्त्वाकांक्षी अशी अन्न सुरक्षा योजना राज्यात रखडली आहे. कारण एक डिसेंबरला त्याची राज्यात अंमलबजावणी होणं अपेक्षित होतं. मात्र त्याची केवळ घोषणा झाली, पण त्याच्या अंमलबजावणी मात्र सरकारच्या लालफितीच्या कारभारात अडकली आहे.

परंतु, एक डिसेंबरला ह्याची अंमलबजावणी होईल, अशी घोषणा केलीच नव्हती अशी सारवासारव आता सरकारकडून केली जातेय. त्याची अंमलबजावणी व्हायला आणखी पंधरा लागतील असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आयबीएन लोकमतशी फोनवरुन बोलताना सांगितलं.

अन्न सुरक्षेचे लाभार्थी कोण, याबद्दल अजून निर्णय नाही. अन्न सुरक्षेसाठी जादा आर्थिक तरतूद कुठून आणायची याबाबत अजून धोरण निश्चिती नाही. केशरी कार्ड धारकांपैकी कुणाला वगळायचं याबाबत अजून निर्णय झालेला नाही.

close