फहीम अन्सारीच्या पोलीस कोठडीत वाढ

February 13, 2009 1:15 PM0 commentsViews: 2

13 फेब्रुवारी, मुंबई फहीम अन्सारीचा मंुबई हल्ल्याशी काहीच संबंध नाही. त्यामुळे त्याच्यावरचे आरोप चुकीचे असल्याची याचिका फहीमच्या वकिलांनी मंुबई हायकोर्टात दाखल केली होती. कोर्टानं ही याचिका फेटाळून लावलीय. अशी याचिका आरोपीनं स्वत: करावी त्यानंतरच याचिकेवर विचार केला जाईल. आरोपीच्या वकिलांना अशी याचिका दाखल करता येणार नाही, असा निर्णय कोर्टानं दिलाय. फहीमला 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. त्याचा साथीदार सबाउद्दीन अहमद यालाही किला कोर्टानं याआधीच पोलीस कोठडी दिलीय. मंुबईवरच्या दहशतवादी हल्ल्यासाठी अतिरेक्यांना मदत करणारा संशयित फहीम अन्सारी सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीये. उत्तरप्रदेशमधल्या रामपूर सीआरएफ सीआरएफमध्ये 2006 साली स्फोट केल्याप्रकरणी फहीमवर रामपूरला खटला सुरू आहे. मुंबईवरच्या हल्ल्यासाठी लष्कर ए तैयबाचे दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत येणार असल्याची माहिती फहीमला होती. त्यासाठी आवश्यक ते नकाशेही त्याच्याकडे सापडल्याची पोलिसांची माहिती आहे. तसंच दहशतवाद्यांना या प्रवासासाठी त्याने मदतही केली असल्याचा संशय आहे. फहीमला उत्तरप्रदेश पोलिसांनी फेब्रुवारी 2008 मध्ये अटक केली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी फहीमला त्याचवेळी ताब्यात घ्यायला हवं होतं, फहीमचा 26/11 च्या मुंबई हल्ल्यांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे फहीमवर 26/11 मुंबई हल्ल्यांचा आरोप ठेवणं चुकीचं आहे अशी याचिका फहिमचे वकिल एजाज नकवी यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. मुंबई हायकोर्टानं ही याचिका आज रद्द केलीये. अशी याचिका आरोपीनं स्वत: करावी त्यानंतरच याचिकेवर विचार केला जाईल. आरोपीच्या वकिलांना अशी याचिका दाखल करता येणार नाही असा निर्णय देत कोर्टानं फहीमच्या वकिलांची याचिका रद्द केली. फहीमचा साथीदार सबाउद्दीन अहमद यालाही 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुंबईच्या किल्ला कोर्टानं याआधीच दिलेत.

close