प्रमोद मुतालीक यांना अटक

February 13, 2009 1:59 PM0 commentsViews: 12

13 फेब्रुवारी, कर्नाटक श्रीराम सेनेचे नेते प्रमोद मुतालीक यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केलीय. व्हॅलेंनटाईन डे च्या सेलिब्रेशनला श्रीराम सेनेनं विरोध केलाय. व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करणार्‍यांचं लग्न लावून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला होता. म्हणून कर्नाटक पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केलीय. गुलबर्ग्याहून बिदरला जाताना मुतालिकला अटक करण्यात आलीये. उद्या संध्याकाळपर्यंत मुतालिकला कोठडीत ठेवण्यात येणारेय.

close