एच.आय.व्ही.ग्रस्त ड्रायव्हरला मिळाला न्याय

December 1, 2013 12:28 PM0 commentsViews: 190

1 डिसेंबर : पुण्यातल्या एच.आय.व्ही ग्रस्त ड्रायव्हरला अखेर न्याय मिळाला. त्याला एसटी प्रशासनाने मेडिकल तपासणीचा बहाणा करून कामावरून काढून टाकले होते. IBN लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर परिवहनमंत्र्यांनी त्याला कामावर परत घेण्याचे आदेश दिले होते.

 

त्यानंतरही अधिकार्‍यांकडून त्याची टाळाटाळ केली जात होती. यानंतर हे संपूर्ण प्रकरण हायकोर्टात गेलं आणि हायकोर्टाने सप्टेंबरमध्ये त्याला कामावर परत घेण्याचे आदेश दिले होते. त्याबरोबरच आता त्याला कामावरून काढेलल्या अडीच वर्षांच्या कालावधीचा पगार आणि 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत पण ही नुकसानभरपाई त्यांना अजून मिळालेली नाही.

close